सत्काराने कामाची गती वाढून उत्साह दुणावतो -माजी आमदार शिरीष चौधरी

0

रावेरला भगवती परीसर मंडळ संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

रावेर- तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व विविध समित्याममधे नियुक्ती होऊन काम करणार्‍या व्यक्तीचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याची गती वाढून त्यांचा उत्साह द्विगुणित होतो, असे सांगत त्या गोष्टीचा वेध घेवून रावेर येथील भगवती परीसर मंडळ संस्थापक व संस्था चालकांचे कार्य गौरवास्पद असल्याचे उद्गार माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे काढले. भगवती परीसर मंडळ संचलित डॉ.अनंत नेमीदास अकोले माध्यमिक विद्यालय व डॉ.शांताबाई रघुनाथ पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील होते. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष राजीव पाटील, मसाकाचे उपाध्यक्ष भागवत पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, पत्रकार कुमार नरवाडे, कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा झाला गौरव
रावेर पोलिस स्टेशनला नुकतेच रूजू झालेल्या पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, दक्षिण कोरीयामधे कांस्यपदक पटकावलेल्या जीवन पाटील, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक साहेबु मैबु तडवी, काँग्रेस सेलतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार कल्पना पाटील, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रमोद पाटील, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार कुमार नरवाडे, रेस्युडीव्ह फ्री ऑरगॅनिक मिशन इंडीया फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, डॉ.शांताबाई रघुनाथ पाटील आदी मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष राजीव पाटील, उपाध्यक्ष लिलाबाई पाटील, सचिव पंकज पाटील, प्रवीण पाटील, आदींनी केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अकोले, एस.पी.पाटील, कल्पना पाटील, कोकीळा पाटील, राजाराम गणू, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, विजय पाटील, नरेकर, भालेराव, योगेश मोरे, किरण शेलोळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष राजीव पाटील यांनी तर सूत्रसंचलन एस.पी.नेरकर, एस.व्ही.केळकर यांनी केले. आभार सचिव पंकज पाटील यांनी मानले.

Copy