सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

0

फैजपूर : फैजपूर, वढोदा, विरोदासह परीसरात सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत अर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण करण्यात आले. संतामार्फत असे उपक्रम पुढेही चालू राहतील, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी म्हटले. अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथीमधील हे औषध कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या उपचारपद्धतींत अधिक संशोधन व्हावे याकरीता आयुष मंत्रालयानेही मान्यता दिली आहे तसेच अर्सेनिक अल्बम आपली रोगप्रतिकारक शक्ती व कोरोना रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार ठरू शकतो. या कोरोनाच्या सावटात आशेचा किरण दिसू लागला आहे. या औषधाचे वितरण सतपंथ मंदिर संस्थान, फैजपूरचे अध्यक्ष सतपंथ रत्न महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यांचे लाभले सहकार्य
उपक्रमासाठी पंकज चौधरी, युवराज किरंगे, रोहन चौधरी, मयुर भारंबे, उत्कर्ष भारंबे, उमेश भारंबे, स्वप्निल भारंबे, पुष्पक पाटील, युवराज कापडे, जितेंद्र कापडे, प्रा.प्रकाश ठोंबरे, राजु किरंगे, अशोक नारखेडे, कडु चौधरी, व्ही.ओ.चौधरी आदी सेवकांचे सहकार्य लाभले.

Copy