सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप

0

फैजपूर : ‘देश और समाज हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे…
फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने तसेच वडोदा, करंजी, व लिधुरी या गावातील सेवाभावी नागरीकांच्या सहकार्याने तेथील गरीब, निराधार गरजवंत अशा कुटुंबाला धान्य व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

गरजूंनी व्यक्त केले समाधान
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन खारीचा वाटा उचलत गरीबांना दान केले. यामुळे काही दिवस का होईना पण गरीबांना आधार झाला आहे. महाराजांनी दान देण्यासाठी एक हात पुढे केला तर परीसरातील अनेकदा त्यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री निधीत रक्कम दान दिली व परीसरातील गावांमध्ये गरजू गरीब दीनदुबळ्यांना दान देण्यासाठी शेकडो हात पुढे आले आहेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसाराची चाके थांबली आहेत. यात निराधार व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून समाजातील अनेक सेवाभावी संस्था तसेच नागरीक आपापल्या परीने सहकार्य करीत असल्याचे समाधान जनार्दन हरिजी महाराज व डॉ.अजित थोरबोले यांनी व्यक्त केले.

Copy