सडावणला विहिरीत पडून सासू-सुनेचा मृत्यू

0

अमळनेर : तालुक्यातील सडावण येथे सुमारास सुनेला वाचवताना सासू हि विहिरीत ओढली गेल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्देेवी घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. पुष्पा विनोद पाटील व विमलबाई आत्माराम पाटील अशी मृतांची नावे आहेत. दोघी कापूस वेचणीसाठी शेतात गेलेल्या होत्या. पिण्यासाठी विहिरीतून पाणी काढत असताना ही घटना घडली.

पिण्यासाठी पाणी काढत असताना अपघात
सडावण येथील पुष्पा पाटील व त्यांच्या सासू विमलबाई पाटील या दोघी कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. त्या दरम्यान,पिण्यासाठी पाणी काढण्यासाठी दोघीही विहिरीवर गेल्या. पुष्पा पाटील विहिरीतून दोरीच्या सहाय्याने पाणी काढत असताना विहिरीला कठडा
नसल्याने विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी विमलबाई पाटील यांनी दोर पकडला मात्र, त्याही विहिरीत ओढल्या गेल्या. ही बाब शेजारील शेतात कापूस वेचणार्‍या महिलेच्या लक्षात आली. नंतर हि बाब गावकर्‍यांना कळविले त्यानंतर दोघींचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. विमलबाई यांचे पती आत्माराम पाटील हे आजारी असून अंथरुणावर खिळले आहेत. तर विनोद हा एकमेव मुलगा असून त्याला लहान दीड वर्षांची लहान मुलगी आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश तोळे यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.