सचिन सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0

चाळीसगाव । राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आर्दश शिक्षक पुरस्कार 2016 दादर (मुंबई) येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रीय अंध शाळेचे विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असेलेले सचिन सोनवणे यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार सोहळा 5 फेब्रुवारी 2017 रोजी दादर मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडला. दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सादर पुरस्कार शेगावीचा गजानन चित्रपटातील अभिनेते मुकुंद वसुले व शत्रुघ्न सिन्हा यांचे डुप्लिकेट अभिनेते शमुबीन सिन्हा यांच्याहस्ते देण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री पदमजा खटावकर, गर्जा महाराष्ट्र चॅनल चे अनिल महाजन, भारूड साम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी, डॉ. नंदकिशोर पाटील, संतोष राऊत, अवकाश जाधव, प्रमोद पाटील, विजय वैद्य, राखी राउकर, मंगला बारी आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ एम बी पाटील, चिटणीस अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ संजय देशमुख दुय्यम चिटणीस संजय पाटील, शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.