नाट्यमय: सुनावणीपूर्वीच अध्यक्षांनी मागे घेतली याचिका: पायलट गटाला मोठा दिलासा

0

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेत अशोक गेहलोत यांचे सरकार अडचणीत आणले ओटे. कॉंग्रेसने सचिन पायलट आणि काही सहकारी मंत्र्यांवर कारवाई केली. सचिन पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि त्यांच्या गटातील आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत नोटीस दिली होती. या नोटीसीला पायलट गटाने कोर्टात आव्हान दिले होते. कोर्टाने देखील सचिन पायलट गटाला दिलासा दिला. आता अतिशय नाट्यमयरित्या सकाळी ११.०० वाजता सुनावणी सुरू होण्याआधीच विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी आपल्या याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे पायलट गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच याचिका मागे घेऊन राजस्थान प्रकरणी राजकीय लढाई लढावी, अशी काँग्रेसमधील काही नेत्यांनी भावना व्यक्त केली होती. आता या प्रकरणावर सुनावणीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयात वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.

राजस्थानमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज, सोमवारी देशभरातील सर्व राजभवनांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राजस्थानात मात्र काँग्रेस हे आंदोलन करणार नाही. दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ३१ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याचा नवा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे पाठविला.

Copy