संसारासोबत सांभाळतो आम्ही परिवहनचा कारभार

0

नवी मुंबई । नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या घणसोली आगारामध्ये दीपाली गवळी, कांचन राऊत, अर्चना घुगे, आरती गायकवाड, संगीता कांबळे, चित्रा शलके, जयमाला शिंदे, शीला नेटके या आठ महिला वाहक कार्यरत आहेत. त्या आगारामधील परिवहनच्या 20, 9, 121 क्रमांकाच्या बसेसवर त्या सेवा देत आहेत. आपल्या संसाराला साथ मिळावी म्हणून आपापली घरची कामे सांभाळून परिवहनमधील वाहकाची नोकरी टिकवून आहेत.

मुलांच्या शिक्षणांचे स्वप्न पुरे व्हावे म्हणून काहींनी नोकरी पत्करली असल्याचे महिला वाहकांनी सांगितले. वाशी, नेरूळ व मुंबईला जाणार्‍या बसेसमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. असे असतानाही या महिला बिनधास्तपणे आपले काम अचूकपणे करत आहेत. घणसोली आगार म्हणजे आमचे माहेर व आम्ही त्यांच्या कन्या आहोत असेही त्या प्रामाणिकपणे सांगतात. घणसोली आगारातील आठ महिला गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहेत.