संशयिताला 12 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव । कुसुंबा खुर्द येथे योगेश देशमुख यांच्या घरात चोरी करून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक करून त्यास रविवारी न्या. एस.जी.शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुसुंबा खुर्द येथील योगेश गजानन देशमुख हे गावाला गेल्यानंतर परस्पर कामाला निघून गेल्याने घरी कुणीही नव्हते. तर त्यांच्या पत्नी देखील माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी एलईडी व 12 हजारांची रोकड असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तीन महिन्यानंतर देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांनी या घरफोडी प्रकरणी भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारेयाला ताब्यात घेवुन या गुन्ह्यातील सखोल विचारपूस करण्यासाठी तसेच चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी व या व्यतिरीक्त या गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा समावेश आहे का? याची माहिती जाणुन घेण्यासाठी पोलिसांनी त्याला रविवारी न्या. शिंदे यांच्या न्यायालतयात हजर करण्यात आले. 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.