संशयिताचा जामिन अर्ज फेटाळला

0

जळगाव । जानकीनगर परिसरातील डॉ. दिलीप राणे यांच्या दवाखान्यासमोर 12 ऑक्टोबर 2016 रोजी चौघांनी दोन तरूणांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चौघांना अटक केली होती. या प्रकरणी एका संशयिताने न्या. आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज गुरूवारी फेटाळला आहे.

जानकीनगरात 12 ऑक्टोबर 2016 रोजी सुरेश उर्फ सुरज विजय ओतारी (वय 23), दत्तू उर्फ गोल्या नारायण चौधरी (वय 24), गणेश शंकर पाटील (वय 26), मयूर उर्फ मनोज शालीकराम चौधरी (वय 23) यांनी निलेश दगडू वाघ (वय 19), संदीप मारोती सपकाळे यांना पुर्ववैमनस्यातून मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. सध्या सर्व संशयीत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यापैकी सुरेश ओतारी याने न्यायाधीश कटारीया यांच्या न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज गुरूवारी फेटाळला आहे. सरकारतर्फे ढाके यांनी यांनी कामकाज पाहिले.