संशयितांच्या जामीनावर सरकारपक्षातर्फे खुलासा सादर

0

जळगाव । तांबापुरा येथिल हुमेरा शेख या 27 वर्षीय महिलेचा प्रसुती नंतर अतिरक्तस्त्राव होवून मृत्यु झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून ममता हॉस्पीटलची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणातील कोठडीत असलेले दोन संशयितांनी न्या.ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सरकारपक्षातर्फे खुलासा सादर करण्यात आला. 29 मार्च रोजी हुमेरा शेख यांचा प्रसुतिनंतर अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नातेवाईकांकडून सायंकाळी 7 वाजता ममता हॉस्पीटलची तोडफोड करण्यात आली होती.

याप्रकरणी डॉ. शाहिद खान यांच्या फिर्यादिवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयातील दोन संशयीत जाबीर चाँद पिंजारी व तनवीर युनुस पिंजारी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची कोठडीत रवागनी करण्यात आली. दरम्यान, दोघां संशयितांकडून न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज बुधवारी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी खुलासा दाखल केला आहे.

फसवणुकप्रकरणी तिघांना 8 पर्यंत पोलिस कोठडी
जळगाव। तालुक्यातील तसेच शहरातील भुखंडांचे बनावट कागदपत्रे तयार करून एप्रिल 2016 ते 14 जून 2016 पर्यंत खरेदी केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन संशयीताना बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश कॉलनीतील अभय उमाकांत भंगाळे यांच्या मालकीच्या पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक 152 मधील भूखंड, निमखेडी शिवारातील गट क्रमांक 122 मधील दोन भूखंड, मेहरूण परिसरातील रचना नगरातील तीन भूखंड बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केली होती. या प्रकरणी भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 फेब्रुवारी रोजी मयूर शदर राणे, जगदीश सोनवणे, हेमकांत भंगाळे, निलेश भंगाळे, विष्णू भंगाळे, प्रतिभा विष्णू भंगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी 5 रोजी निलेश विष्णू भंगाळे, विष्णू रामदास भंगाळे, प्रतिभा विष्णू भंगाळे यांना अटक केली. त्यांना बुधवारीच दुपारी न्या. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. पाटील यांनी तिघांना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.