संविधान दिन: जाणून घेऊया थोडक्यात माहिती !

0

नवी दिल्ली-संपूर्ण देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान तयार झाले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रथमच संविधान दिवस साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संपूर्ण भारतासाठी मजबूत अशी राज्यघटना तयार केली होती. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अमलात आले.

संविधानाशी निगडीत काही महत्वपूर्ण माहिती

१.डॉ.भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले होते.
२.संविधान पारित झाल्यानंतर सर्व २८४ सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यात १५ महिलांचा समावेश होता.
३.भारतीय संविधानाला जगातील सर्वश्रेष्ठ लिखित संविधान मानले जाते. संविधानाच्या मूळ प्रत आजही हीलियमच्या आत टाकून संसदेच्या ग्रंथालयात ठेवण्यात आलेली आहे.
४.भारतीय संविधानाची मूळ प्रत छापील नव्हती, ती हस्तलिखित होती. त्यानंतर हिंदी व इंग्रजी भाषेत त्यांचे लिखाण झाले.
५.२६ जानेवारी १९५० ला सारनाथ येथील अशोकद्वारा बनविलेल्या सिंह स्थंभाला भारताचा राष्ट्रीय प्रतिक म्हणून घेण्यात आले.

Copy