संरक्षण अर्थसंकल्प, विषयावर कार्यशाळा

0

जळगाव। मूळजी जेठा महाविद्यालयातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने संरक्षण अर्थसंकल्प : सामरिक दृष्टीकोन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सोमवार 20 रोजी सकाळी 9.30 ते 4 दरम्यान नवीन कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

ह्या कार्यशाळेत संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. पी. चौधरी, प्रा. डॉ देवेंद्र विसपुते, प्रा. जे. डी. लेकुरवाळे आदी मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.