संपूर्ण तुर खरेदीसाठी काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी निदर्शने

0

भुसावळ/यावल। राज्यभरात तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे बहुतांशी शेतकर्‍यांचा माल खरेदीसाठी प्रलंबित आहे. यामुळे शेतात पिकविलेला माल आता विकावा तरी कसा, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर पडला असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर तूर खरेदी केंद्र सुरु करुन शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

कमी भावात करावी लागते तुरीची विक्री
शासनाकडून नाफेडमार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी केेंद्र बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हाभरात हजारो क्विंटल तूर विक्रीअभावी नाफेड खरेदी केंद्रावर पडून आहे. शेतकर्‍यांना नाईलाजास्तव कमी भावात तुरीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे नाफेड खरेदी केंद्र व्यवस्थापन यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

यावल येथे आंदोलनात यांचा होता सहभाग
रावल रेथे तालूका काँग्रेस कमेटीतर्फे निदर्शने करण्रात आली. याप्रसंगी प्रभाकर सोनवणे, भगतसिंह बापू, हाजी शबीर, शहाअध्रक्ष कदीर खान, संदीप सोनवणे, खलील शाह, विवेक सोनार, अमोल भिरुड, हाजी गफ्फार, अनिल जंजाळे, राहूल बारी, सैय्रद ईखलास, समिर खान, जलील पटेल, शे.नईम पिंजारी, देवेंद्र बेंडाळे आदी उपस्थित होते.

भुसावळ येथे दिले निवेदन
भुसावळ येथे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष रविंद्र निकम, प्रदेश प्रतिनिधी योगेंद्रसिंग पाटील, शहर सरचिटणीस रहिम कुरेशी, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष विलास खरात, भगवान मेढे, प्रमोद पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, प्रशांत पाटील, जयेंद्र शुरपाटणे, अतुल चौधरी, अन्वर तडवी, अर्जुन तायडे, इस्माईल गवळी, तस्लीम खान, प्रकाश मोरे यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देवून शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.