संपत्तीत मुलीचाही तितकाच वाटा : अमिताभ बच्चन

0

मुंबई। मी हे जग सोडल्यानंतर माझा मुलगा आणि मुलीमध्ये संपत्तीचे समान वाटप केले जाईल, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. समाजात दिली जाणारी स्त्री-पुरुष असमानतेची वागणूक चुकीची असून आपण सर्व समान आहोत असंही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

ट्विटरवर हा संदेश शेअर केला
‘माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या संपत्तीचे वाटप माझा मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटप करा’, असे ट्विट बिग बींनी केले आहे.