संत मुक्ताबाई महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची फी परत न केल्यास तीव्र आंदोलन

0

तर नॅक कमेटीसमोर पितळ उघडे पाडणार ; शिवसेना महिला आघाडीचा ईशारा

मुक्ताईनगर- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे सन 2017 -18 चालु वर्षाची ज्युनियर कॉलेजची अ‍ॅडमिशन फी शासनाच्या नियमानुसार न घेता वाढीव स्वरूपात घेत विद्यार्थ्यांची सर्रासपणे लूट केली होती तर मध्यंतरीच्या काळात विविध समाजाचे आरक्षणबाबत आंदोलन झाल्याने शासनाने या काळात विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन अर्धी फी परत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतांना महाविद्यालयाने फी परत न केल्याने संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मागणी करून त्यांच्या मागणीला केराची टोपली दर्शवली जात असल्याने शिवसेना महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. तातडीने विद्यार्थ्यांना फी परत करावी अन्यथा महाविद्यालयात निदर्शने करण्यात येतील शिवाय भविष्यात येण्यार्‍या युजीसी किंवा नॅक कमेटीसमोर महाविद्यालयाचा हा गंभीर प्रकार उघडकीस आणला जाईल, अशा इशार्‍याचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महीला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे-शिरसाठ यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एल बी.गायकवाड यांना दिले आहे. प्रसंगी शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक शारदा भोई, नगरसेवक संतोष मराठे, रोहिदास शिरसाठ, स्वप्निल श्रीखंडे, शुभम तळेले, श्रीकुंद जैन यांच्यासह असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Copy