संत नरहरी सोनार यांच्या जयंतीनिमित्त पुरस्काराचे वितरण

0

जळगाव । महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जिल्हा जळगावतर्फे महाराष्ट्राचे आद्य संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या 731वी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गणपती नगरातील मुक्तानंद ध्यान मंदिर येथे करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजास दिलेली शिकवण कायम समाज मनात तेवत रहावी या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. धनजी जर्नादन सोनार, रामदास ओंकार अहिरराव यांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विशेष आमंत्रीत सोनार समाजातील सर्व पोट शाखेतील 101 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

60 वर्षांपासून सुवर्णकार म्हणून काम
जळगाव शहर हे संपूर्ण भारतात सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. या सुवर्णनगरी म्हणून नावारूपाला आणण्यात समाजाचा सिंहाचा वाटा आहे. यात सुमारे 50 ते 60 वर्षांपासून सुवर्ण कारागीर म्हणून कलाकुसरीचे कामे केली आहेत व करीत आहेत. तसेच ज्यांनी असंख्य कुशल कारागीर घडविले व हाच व्यवसाय सामर्थ्यांने पुढील पिढीकडे सोपविले व त्यांना नावारूपास आणणार्‍या जेष्ठ कारागीरांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, मुक्तानंद ध्यान मंदीर जळगावचे अध्यक्ष धनाजी जनार्दन सोनार, सोनार समाजाचे धर्माधिकारी रामदास ओंकार अहीरराव, सेवानिवृत्त आयकर अधिकारी सुरेश काशिनाथ रूमाले, जेष्ठ समाज सेवक प्रल्हाद नारायण बागुल, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय बाबुराव विसपुते, उपाध्यक्ष अरूण श्रीराम वडनेरे, विजय केशवराव वानखेडे, राजेंद्र जगन्नाथ विसपुते, संजय नथ्थु पगार, इच्छाराम गोविंद दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी
तुळशीदास यावदशेठ दापोरेकर, पंडीत हरीशेठ विसपुते, दिनकर हरीशेठ विसपुते, काशीनाथ विसपुते, शांताराम जगन्नाथशेठ पिंगळे, भगवान उखाशेठ अहिरराव, वसंत रामदास भामरे, मधुकर गणपत विसपुते, दत्तात्रय बाबुराव आडावदकर, अनंत विश्‍वनाथ दापोरेकर, भास्कर रामदास भामरे, दत्तात्रय जगताप वारूळकर, बाबुराव शंकर बाविस्कर, सुधाकर मगन दुसाने, रमेश श्रीधर गंगापूरकर, बाळकृष्ण सराफ, लक्ष्मण उमराणेकर, अशोक खरे, जगन्नाथ विसपुते, वाल्मिक जगदाळे, देवीदास जाधव, कैलास वडनेरे, हिरालाल विसपुते.