संत तुकारामनगरात एटीएम फोडले

0
पिंपरी  गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी 1 लाख 52 हजारांची रोकड पळवून नेली. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज समोर अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून त्यातील रोकड चोरून नेली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Copy