Private Advt

संतापजनक : भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या विवाहितेवर सामूहिक अत्याचा

सातारा तालुक्यात 25 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार

सातारा : महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. सातार्‍यातील जैतापूर गावाजवळील पुलाजवळील निर्जनस्थळी भीक मागून उदरनिर्वाहळ करणार्‍या विवाहितेवर दोघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला तर दोघांनी अश्‍लील केले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशिर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता, सातारा) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

दुचाकीवर बसवून नेत केला अत्याचार
सातारा शहर व परीसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या 25 वर्षीय विवाहिता शनिवार, 23 रोजी सायंकाळी पाच वाजता तिच्या लहान मुलीसमवेत रहिमतपूर रस्त्यावर उभी असताना संशयीत दोन दुचाकीवरून तेथे आले. ‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, जैतापूर गावच्या हद्दीतील पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबविली. पीडित महिलेला ओडत रस्त्याच्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेले. येथे नम्या भोसले आणि मयूर काळे या दोघांनी त्या महिलेवर सामुहिक अत्याचार केला. तर किरडेट पवार आणि भगत काळे यांनी त्या महिलेसोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर जीवे ठार मारेन, अशी तिला धमकी दिली.

पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपींना अटक
या प्रकारानंतर संबंधित पीडित महिला आणि तिच्या मुलीला तिच्या घराजवळ सोडण्यात आले. यानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. परंतु पीडित महिलेने या प्रकाराची सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून काल, रविवारी रात्री चारही संशयीतांना अटक केली. महिला पोलिस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे या अधिक तपास करीत आहेत.