संतापजनक: भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसेंचा अपमानजनक उल्लेख

0

जळगाव: भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबासाईटवर भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची यादी आहे. या यादीत मोठी घोड चूक झाली असून भाजपच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या आक्षेपार्ह आणि अपमानजनक उल्लेख केलेला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावरून संताप व्यक्त केला असून कारवाईचा इशारा दिला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे “होमोसेक्सुअल” (महाराष्ट्र)असा उल्लेख केलेला आहे.

Shocking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in.

अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,’ असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

Copy