संतांचे कार्य समाज कल्याणासाठी

0

फैजपूर । शास्त्री धर्मप्रसाददास यांचे संपूर्ण जीवन समाजाला समर्पित आहे. म्हणून समाजाचे आदर्श व अद्वितीय गुरु आहे. ते आजन्म स्वतःच्या शिष्याचा आध्यात्मिक विकास व्हावा, स्वामीनारायणचा प्रचार व्हावा म्हणून झटले. समाजात आध्यात्मिक भाव रुजावे व तिचा उत्कर्ष व्हावा म्हणून स्वतःच्या जीवनाचा त्यांनी होम केला. शरण आलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या मनात भगवतभाव जागृत करुन आलेल्या जीवात्म्याला ज्ञानउपदेश करुन समाज अवगत सन्मुख करण्याचा कसोशिने प्रयत्न केला, असे भावपूर्ण उद्गार गांधी नगर येथील शास्त्री ज्ञानप्रकाशदास यांनी केले. येथील स्वामीनारायण व स.गु. शास्त्री धर्मप्रसाददास यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याप्रसंगी ते भाविकांना आशिर्वचन देतांना बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी गुजरात, महाराष्ट्रासह स्वामीनारायण संप्रदायातील अनेक सत्संगी पुरुष व महिला उपस्थित होत्या.

अविस्मरणीय सोहळा
आपल्या प्रसादिक वाणीद्वारे उपस्थित भक्तांना आशिर्वचन देतांना महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज म्हणाले की, संत जेव्हा अगरबत्तीसारखा स्वतः जळून समाजाला सुगंध देत असतो तेव्हाच आदर्श समाज घडत असतो आणि असा सत्संगी समाज घडविण्याचे कार्य शास्त्री धर्मप्रसाददास यांनी केले आहे. त्यांच्या पवित्र जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळते. तर कुुंडल येथील स्वामी ज्ञानजीवनदास यांनी सांगितले की, लहानपणापासून पाहत आलो आहे. धर्मप्रसाददास यांना समाजातील गुणग्राहकता दिसत आली आहे. माझ्या जीवनात एखाद्या संताचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा भव्यदिव्य स्वरुपात संपन्न होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

धर्मप्रसाददास यांचे जीवन निर्मळ व पवित्र
सुत्रसंचालन शास्त्री किशोरदास यांनी केले. कार्यक्रमात वडताल येथील शास्त्री स्वामी नौतम प्रकाशदास उपस्थित होते. त्यांनी आपल्या भक्तिपूर्ण विवेदनातून सांगितले की, आजची उत्सवमुर्ती शास्त्री धर्मप्रसाददास यांचे खुप मोठे योगदान आहे. आमच्या सर्व संतांचे ते भाग्यवान गुरु आहे. धर्मप्रसाददास यांचे जीवन निर्मळ व पवित्र आहे. अशाप्रकारे उपस्थित भाविकश्रोत्यांच्या मनातील भावना आपल्या शब्दातून व्यक्त केल्या. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज उपस्थित होते.

विविध पदार्थांद्वारे केली तुला
भक्तिप्रकाश शास्त्री यांनी सांगितले की, जोपर्यंत समाजामध्ये शास्त्री धर्मप्रसाददास यांसारखे संत राहतील तो पर्यंत समाज ज्ञानी व संस्कारी राहील. असे संत भारतीय संस्कृतीचे धरोहर आहे. अशी संत रत्ने फैजपूरला मिळाली आहे. धर्मप्रसाददास यांच्या 12 तुला करण्यात आल्या. धर्मप्रसाददास आपल्या आशिर्वचनात म्हणाले की, माझे गुरु शास्त्री निळकंठदास यांनी शिष्य बनून मला या पात्रतेपर्यंत पोहचविले. 32 संतांचे माझे शिष्यमंडळ व हरीभक्त समुदाय यांच्या सुखासाठी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो व समाजावरील आदर त्यांनी व्यक्त केला.