संजय निरुपम परप्रांतीय भटका कुत्रा-मनसे

0

मुंबई – “उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल,” असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले होते. निरुपम यांच्या या विधानाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी उत्तर भारतीय मुंबई चालवतात, त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान केले होते. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवले, तर मुंबईकारांना जेवायलाही मिळणार नाही,’ असे निरुपम म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला काम बंद करायला भाग पडू नका, असा अप्रत्यक्ष इशारादेखील त्यांनी दिला होता

Copy