संजय गरूड म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना

भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार यांचा टोला

जामनेर (प्रतिनिधी)- मंत्रालयात जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची ५ मे रोजी भेट घेऊन जलसंपदा विभागाच्या जिल्ह्यातील इतर कामांसह जामनेर तालुक्यातील कामांबाबत निवेदन सादर केले होते. या प्रयत्नांना यश आले
असून जलसंपदा विभागाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक कामांचा समावेश झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात ही कामे आमदार महाजन यांनी पूर्वीच केलेली असुन संजय गरूड म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असल्याचा टोला भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी आज एका पत्रकार परिषदेत लगावला.
भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, पिंपळगाव बुद्रुक येथे वाघूर नदीवर पूर संरक्षक भिंत बांधणे या कामाचा प्रमा आदेश २२ मार्च २०१६ व सुधारीत आदेश ०१ सप्टेंबर २०१८ रोजी निघाले असून आज रोजी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. शेंदुर्णी येथे सोनद नदीवर
काजीपुरा मशिदीच्या उजव्या बाजूस पूर संरक्षक भिंत बांधणे या कामाची मान्यता ०१ सप्टेंबर २०१८ रोजी निघून २०२० मध्ये काम पूर्ण झाले. पहूर पेठ येथे मारुती मंदिराच्या वरील बाजूस पूर संरक्षक भिंत बांधणे दि २० एप्रिल २०१७ रोजी मान्यता घेऊन ७५टक्के काम पूर्ण झाले आहे. नाचणखेडा येथे लोकवस्ती व बाजारपेठ जवळ पूर संरक्षक भिंत बांधणे १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता होऊन काम प्रगती पथावर आहेे. नाचणखेडा येथे मारुती मंदिरात पूर संरक्षक भिंत बांधणे, नाचणखेडा येथे दत्त मंदिर जवळ पुर संरक्षक भिंत बांधणे कामाची मान्यता १३ फेब्रुवारी २०१९ काम प्रगतीपथावर आहे. यापूर्वीच माजी मंत्री आमदार गिरिष महाजन यांनी या कामांची प्रशासकीय मंजुरी होऊन कामांचे टेंडर होऊन यातील काही कामे पूर्ण झाली व काही पूर्णत्वास येत आहेत. ही कामे आमदार महाजन यांच्या निधीतून व प्रयत्नातून झाले असल्याचा दावा तालुका भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर यांनी केला आहे. दरम्यान संजय गरूड यांनी श्रेय घेऊ नये असे सांगत बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, न प गटनेते डॉ प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अतिष झालटे, रवींद्र झालटे आदी उपस्थित होते.