संचारबंदीचे उल्लंघन: फैजपुरात पहिला गुन्हा दाखल

0


फैजपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदीचे आदेश असतांना सुद्धा शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील प्रितम रमेश दूधाणी (वय 33) रा दक्षिण बाहेर पेठ याच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. असे असतांना प्रितम रमेश दुधाणी हा आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होण्याकरिता जमावबंदी आदेशानंव्ये कार्य बजावत असतांना पोलीस कॉ विष्णू पोहेकर यांच्याशी हुज्जत घातली व सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून शांततेचा भंग केल्याने पो कॉ विष्णू पोहेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy