संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग

0

हिंजवडी : पूर्वी एकाच कंपनीत काम करत असलेल्या एका संगणक अभियंता तरुणीचा तिच्या मित्राने विनयभंग केला. लग्नाच्या आग्रहातून आरोपी तरुणाने फिर्यादी तरुणीला त्रास दिला. ही घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 26 वर्षीय संगणक अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कपिल जोहरी (रा. बाणेर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि आरोपी कपिल हे दोघे पूर्वी एकाच कंपनीत काम करीत होते. त्याच कंपनीत दोघांची मैत्री झाली होती. कपिल याला फिर्यादी तरूणीशी लग्न करायचे होते. मात्र संबंधित तरुणीने त्यास नकार दिला. तरी देखील मागील पाच महिन्यापासून कपिल त्या तरूणीचा पाठलाग करीत होता. आरोपीने फिर्यादी तरूणीला व तिच्या होणार्‍या पतीला वारंवार फोन करून आणि मेसेज करून फिर्यादी तरूणी व आपले प्रेमसंबध असल्याचे खोटे सांगून लग्न मोडण्याची धमकी दिली. यावरून तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे तपास करीत आहेत.

Copy