संगकाराच्या अ’ श्रेणीत 19 हजार धावा

0

लंडन । ’अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 19 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. ग्रॅहॅम गूच (22,211), ग्रॅमी हिक (22,059) आणि सचिन तेंडुलकर (21,999) यांनी ही कामगिरी केली आहे.

संगकारा इंग्लिश कौंटीमध्ये सरेकडून खेळत आहे. स्थानिक वन-डे स्पर्धेत त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्ध 81 धावांची खेळी केली. त्यामुळे सरेला आठ विकेट राखून विजय मिळाला. संगकारा 39 वर्षांचा आहे. 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.