श्री समर्थ रामदास पुस्तकातवर बंदी घाला

0

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी कारका मजकूर छापल्याचा केला निषेध
चाळीसगाव येथे सामाजिक संघटनांनी दिले तहसिलदार व पोलिसांना निवेदन

चाळीसगाव – समर्थ श्री रामदास पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी कारक लेख लिहुन महाराष्ट्रातील शंभुप्रेमी यांची भावना दुखविल्याने चाळीसगाव येथे विवीध संघटनांकडून याचा निषेध करुन समर्थ श्री रामदास पुस्तकावर तात्काळ बंदी घालुन शुभा साठे या लेखिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चाळीसगाव तहसिलदार व पोलिस निरीक्षकाना दि १३ रोजी सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार चुकीची माहिती
ज्यांच्या पराक्रमाने सपूर्ण जग अचंबित होते, अशा पराक्रमी योध्दा असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्द्ल राजा शिवाजी हे सहस्त्रबुद्धे लिखित पुस्तकात अपमान करणारा लेख लिहिण्यात आला व समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात डॉ. शुभा साठे यांनी संभाजी महाराज यांची बदनामी केल्याने महाराष्ट्रात शंभूराजे प्रेमीमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिक्षण विभाग या पुस्तकाला परवानगी देतात ही बाब दुर्दैवी असल्याने पुस्तक छापणाऱ्‍या लाखो प्रकाशनावर तात्काळ बंदी आणावी. तसेच सर्व शिक्षा आभियानातुन महाराष्ट्रात सदरचे पुस्तक जिल्हा परीषद व पंचायत समिती स्तरावरून सर्व शाळांना वाटप करून संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला जात आहे.

आंदोलन करण्याचा इशारा
लेखिका डॉ.शुभा साठे, प्रकाशक व सर्व शिक्षा अभियानाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असे न केल्यास वरील सर्व सामाजीक संघटनांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परीणामास सर्वस्वी पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा रयत सेना, विर भगतसिंग विद्यार्थी परीषद, प्रगत संस्थेतर्फे देण्यात आला असून जाहीर निषेध करण्यात आला आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार, विर भ.वि.परीषदेचे पंकज रणदिवे, प्रगत संस्थेचे अध्यक्ष खुशाल पाटील, पी. एन.पाटील, संजय कापसे, दिपक राजपुत, सूर्यकांत कदम, खुशाल बिडे, मुकुंद पवार, दिनेश गायकवाड, छोटु अहिरे, राहुल पाटील, उत्कर्ष शिंदे, बबलु चव्हाण, प्रवीण पाटील, प्रदीप मराठे, देवेंद्र पाटील, हेमंत पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र मांडे, आदेश पाटील, वैभव पाटील, गणेश कुंभार, उदय पाटील, अक्षय कुमार, विशाल महाजन, सचिन पवार, जयदीप पवार, पवन पवार, विजय जगताप, अनंत पाटील, विनोद पवार, वैभव पवार, शरद पाटील, बापु पाटील, मंगेश पाटील, सागर पाटील, रामु मोरे अदि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copy