श्री सखाराम महाराज यात्रोत्सवाचे स्तंभारोपण

0

अमळनेर। सं पूर्ण महाराष्ट्रात खान्देश भूषण समजल्या जाणार्‍या प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत सखाराम महाराज यात्रेची मुहूर्तमेढ अक्षय तृतीयेला 28 रोजी सकाळी 9 वाजता गादीधिपती प.पु.प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण परंपरे नुसार अभय देव यांच्याहस्ते करण्यात आले. शुक्रवारी 28 रोजी पहाटे वाडी संस्थानमध्ये विठ्ठल-रूख्माईची विशेष पूजा करण्यात आली. पांडुरंगाला सोन्याची पगडी चढविण्यात आली. त्यानंतर वाडी मंदिराच्या सभामंडपातून संस्थानचे 11 वे गादीपुरूष हभप प्रसाद महाराज हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बोरी नदीपात्रात आले. सुरुवातीला अन्नपूर्णाचे स्तंभारोपण करण्यात आले. त्यानंतर बोरी नदी पात्रात असलेल्या मूळ संत सखाराम महाराजांच्या समाधी समोर अक्षय महूर्तावर श्रीगणेश व स्तंभाची पूजा अभय देव यांनी केल्यानंतर स्तंभारोपण करण्यात आले.

स्तंभारोपण प्रसंगी सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जयदेव, केशव पुराणिक, चारूदत्त जोशी, सारंग पाठक, मिलिंद उपासणी यांनी पौराहित्य केले. मंदिराच्या कळसावर ध्वज प्रल्हाद महाराजांच्या समाधी मंदिराच्या कळसावर भास्कर, भावसार, प्रशांत भावसार यांनी भगवाध्वज लावला. यावेळी आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल पाटील, मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे, महावितरणचे सहा अभियंता दाभाडे, संजय पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक अभिषेक पाटील, विवेक पाटील, राजेश पाटील, विक्रांत पाटील, निलेश भांडारकर, पंडित चौधरी, महेश कोठावदे, सुभाष भांडारकर, अनिल वाणी, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, विश्वस्त मंडळाचे भाऊसाहेब देशमुख, एस.बी.येवले, बंडू नाना देशमुख, अभिजित भांडारकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
सुरुवातीला अन्नपूर्णाचे स्तंभारोपण करण्यात आले. त्यानंतर बोरी नदी पात्रात असलेल्या मूळ संत सखाराम महाराजांच्या समाधी समोर अक्षय महूर्तावर श्रीगणेश व स्तंभाची पूजा अभय देव यांनी केल्यानंतर स्तंभारोपण करण्याप्रसंगी. यावेळी जयदेव, केशव पुराणिक, चारूदत्त जोशी, सारंग पाठक, मिलिंद उपासणी यांनी पौराहित्य केले. मंदिराच्या कळसावर ध्वज प्रल्हाद महाराजांच्या समाधी मंदिराच्या कळसावर भास्कर नामदेव भावसार, प्रशांत भावसार यांनी भगवाध्वज लावला. यावेळी राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.