श्री संत मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अ‍ॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी यांचे निधन

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील मेहुण येथील रहिवासी तथा श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अ‍ॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी (68) यांचे गुरूवार, 28 मे 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलोचनाबाई चौधरी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे. उन्मेश चौधरी यांचे ते वडील होते. ऐतिहासीक श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा व असे सोमेश्वर पुरातन अशी दोन पुस्तके त्यांची नुकतीच प्रकाशित झाली होती. श्री संत मुक्ताई यांच्यासह अनेक विषयांवर त्यांनी अध्यात्मिक पुस्तकांचे लेखन केले आहे. अ‍ॅड.चौधरी यांनी रचलेली नित्य मुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ही संत मुक्ताई यांची आरती वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने गायली जात आहे.

Copy