श्री गजानन महाराज भक्त परिवारातर्फे पायी वारीचे आयोजन

0

जळगाव : हरिविठ्ठलनगरातील श्री गजानन महाराज भक्त परिवारातर्फे श्री क्षेत्र शेगाव पायी वारी काढण्यात येणार आहे. ही वारी नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात काढण्यात येणार आहे. श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराचे शेगाव येथे वारी काढण्याचे हे १२वे वर्षे आहे. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता संत गजानन महाराज यांची आरती करून नामगजरात वारीचे प्रस्थान होणार आहे.

दिंडीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी वारी प्रमुख वामनराव पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री गजानन महाराज भक्त परिवारातर्फे कळवण्यात अाले आहे. हरिविठ्ठलनगरातून १० नोव्हेंबरला सकाळी ५ वाजता दिंडीचे प्रस्थान हाेईल. ११ नोव्हेंबर रोजी तळेगावला श्रावण कोळी यांच्याकडे महाप्रसाद व मुक्काम, १२ नोव्हेंबर रोजी तोरनाडा येथे विलास पाटील यांच्याकडे महाप्रसाद व मुक्काम, १३ नोव्हेंबर रोजी वाघजाळ फाटा येथील विठ्ठल मंदिरात महाप्रसाद व मुक्काम, १४ नोव्हेंबर रोजी कमळनाथ मंदिरात विष्णूभाऊ परिवारातर्फे महाप्रसाद, १६ नोव्हेंबरला शेगावी दिंडीचे आगमन त्यानंतर १७ला संत गजाननबाबांचे दर्शन घेऊन वारीचा परतीचा प्रवास सुरू करेल.

Copy