श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची जळगाव जिल्हा कार्यकारिणी घोषीत

0

ह.प.भ. प्रसाद महाराज अध्यक्ष तर कार्याध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड

जळगाव: श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अमळनेर येथील सदगुरू सखाराम महाजन संस्थानचे ह.भ.प. प्रसाद महाराज यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी अशोकभाऊ जैन यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती जळगााव जिल्हा कार्यालयाचे आज उदघाटन झाले. या कार्यक्रमात संघचालक डॉ. निलेश पाटील यांनी जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषीत केली.

समितीच्या अध्यक्षपदी श्री सदगुरू सखाराम महाराज संस्थान, अमळनेरचे विद्यमान गादीपती ह.भ.प. प्रसाद महाराज गुरू ज्ञानेश्‍वर महाराज यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष म्हणून जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रोहीत निकम जळगाव, ह.प.भ. ज्ञानेश्‍वर माऊली चाळीसगाव यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष म्हणून सुधीर मराठे जळगाव, सहकोषाध्यक्ष म्हणून अतुल देशमुख नगरदेवळा यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून ह. प. भ. मंगेश महाराज जोशी, श्री. श्री. 1008 महामंडलेश्‍वर ह.प.भ.भगवानदास महाराज धरणगाव, ग्यानी गुरूप्रितपालसिंग, डॉ. निलेश पाटील भडगाव, हरीष मुंदडा जळगाव, निरज अग्रवाल अमळनेर, रमेश मोर पाचोरा, गोपाल अग्रवाल पारोळा, प्रा. सुनील पाटील भडगाव, गोपाल पाटील चोपडा, विजय निकम जळगाव, डॉ. मनिष चौधरी जळगाव, संदीप बेदमुथा चाळीसगाव, सुशिल नवाल जळगाव, पंकज काबरा एरंडोल, किसनजी पावरा चोपडा, अनिता कांकरीया, संगिता अट्रावलकर, डॉ. अनिता भोळे जळगाव, संध्याताई तिवारी, डॉ. जयंती चौधरी, देवेद्र भावसार, मंदार पाठक चाळीसगाव, पंकज सोनवणे जळगाव यांचा समावेश आहे.

Copy