श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी लोटली भाविकांची गर्दी

0

भुसावळ । येथील विठ्ठल मंदिर वार्ड मधील मानाचा बिंदु फक्त हिन्दू ग्रुपतर्फे रामनवमी निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेवक तथा शहर प्रमुख मुकेश गुंजाळ, निलेश सोनवणे, जिवन अहिरे, उमाकांत शर्मा, प्रविण चौधरी, सागर सपकाळे, पराग बर्‍हाटे, मंदार बागुल, सनी चौधरी, आकाश कोळी, अजय चौधरी, शुभम तळेले, गौरव तळेले, विशाल, ऋषिकेश बोके, सर्वेश विसपुते यांचेसह सर्व रामभक्त भाविक उपस्थित होते. रामजन्मानिमित्त भविकांना बूंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

रावेरयेथे भव्य मुर्तीची काढण्यात आली मिरवणूक
शहरात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला येथील महालक्ष्मी मंदिरात रामाची पूजा कपिल महाराज यांनी करून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत भव्य रामाची मूर्ती होती. डिजेच्या तालावर धार्मिक गाणे वाजवित मिरवणूक मेन रोड, पोष्ट ऑफीस, पाराचा गणपती, थळा, शिवाजी चौक मार्गे स्वामी विवेकानंद येथे महाआरती होऊन मिरवणूक संपविण्यात आली.

हिंदू-मुस्लीमांनी साजरी केली रामनवमी
खिर्डी खुर्द येथे गावातील हिंदू-मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन श्रीराम नवमी साजरी केली. गावात पुन्हा हिंदू मुस्लिम ऐकतेचे चित्र दिसून आले. तसेच हजरत ख्वाजा मोइनोद्दीन चीश्ती यांची साहवी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील पोलीस पाटील प्रदीप पाटील, पवन चौधरी, निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कदम, रवी माळी, खिर्डी खुर्द उपसरपंच नीलकंठ बढ़े, अल्ताफ बेग, साबीर बेग, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, विलास पाटील, नईम बेग, साजीद खान, रफ़ीक बेग, हर्षल फालक, रहेमान पिंजारी, शेख इम्रान, शेख कय्युम उपस्थित होते. तसेच स्वातिक गणेश मंडळा ने जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचा सत्कार व श्रीरामनवमी साजरी केली. अध्यक्ष सतीष फेगडे तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, सुनील कोल्हे, रमेश पाटील, दत्तू महाजन, गिरीश महाजन, रमेश खाचणे, गोविंद कोळी, सुनील इंगळे, ज्योती कोळी, ग्रामपंचायत सदस्या तेजस्विनी सुपे, विलास पाटील, पंकज महाजन, यश महाजन, लोकेश महाजन, सचिन महाजन आदी उपस्थित होते.

यांचा होता सहभाग
रावेर शहरात रामनवमी मिरवणुकीसाठी सुनील बारी, भास्कर पहेलवान, डी.डी. वाणी, सुरेश शिंदे, विक्की पाटील, गोपाल, काशिनाथ महाराज, रविंद्र महाजन, पिंटू महाजन, किरण सिंगोटे, संतोष बिरपन, ईश्वर महाजन, योगेश गायकवाड़, सुनील गायकवाड़, मनोज पाटील, रमेश महाजन, गणेश देवा, योगेश पाटील, लखन महाजन, नितिन महाजन, अजय महाजन, गोकुळ शिंदे, मिलिंद महाजन, सुभाष चौधरी, अनिकेत बारी, सुनील नागवानी आदींनी परीश्रम घेतले. यावेळी मोठ्या संखेने रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.