श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव । नगरीचे ग्रामदैवत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानच्या विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी 4 रोजी श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी पहाटे 5 ते 8 प्रभु महापुजा अभिषेक व आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता ह.भ.प.देवदत्त मारदे महाराज यांचे किर्तन होणार आहे. दुपारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत दुर्गा सरस्वती भजनी महिला मंडळ यांचे भजनसेवा, वेदमंत्रजागर, सामुदायिक श्रीराम रक्षास्त्रोत पठण होणार आहे. रात्री 9 वाजता गीत रामायणाची सेवा संस्कारभारतीय जळगावचे कलावंत सादर करतील. बुधवारी 5 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात गोपाळकाल्याचे भजन होईल. महोत्सवात भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प.मंगेश महाराज जोशी तसेच समस्त विश्‍वस्त मंडळीनी केले आहे.