श्रीमंत नगरसेवकांना आता वसुलीची चिंता

0

पुणे । पिंपरी महापालिकेत नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेतली. आता झालेला खर्च वसूल कसा होणार, याची चिंता नव्या नगरसेवकांना लागली आहे. ‘लक्ष्मीपुत्र’ उमेदवारांनी केवळ पैशांचा वापर करून इप्सित साध्य केले. ‘निवडून येण्यासाठी काही पण’ हा मंत्र जपत सर्वपक्षीय मालदार उमेदवारांनी पहिल्या दिवसापासून पाण्यासारखा पैसा खर्च केला. दूरचित्रवाहिन्यांवरील कलावंतांना लाखोंची बिदागी देऊन प्रचारात उतरवले. रॅली, पदयात्रा, सभांसाठी रोजंदारीवर माणसे आणली. हॉटेल, ढाब्यांवर जेवणावळी लावल्या. प्रचारासाठी दिवस-रात्र सढळ हाताने खर्च केला.