श्रीनिवास पाटील यांची शरद पवाराशी जवळीक पाहून उदयनराजे चिंतीत

0

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि श्रीनिवास पाटील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला एकाच गाडीतून आल्यानं पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय.

काही दिवसांपूर्वी साताऱ्यात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला कुणीही विरोध केलेला नाही, आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारंनी सांगितलं होतं.