श्रीनगरमध्ये चकमक: तीन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलीस अधिकारी शहीद

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. याचकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना यश आले आहे. दुर्दैवी म्हणजे जम्मू-काश्मीर पोलिसमधील सहाय्यक उपनिरीक्षक शहीद झाले. शहीद झालेल्या अधिकाऱ्याचे नाव बाबू राम असे आहे.

श्रीनगर जिल्ह्यातील पंथ चौक भागात ही चकमक झाली. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. 29-30 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हे दहशतवादी दुचाकीवरून आले होते. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सैन्याने दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. राज्यातील काही भागातून दररोज चकमकीचे अहवाल येत आहेत. गेल्या दोन दिवसांतील चकमकीची ही तिसरी घटना आहे.