श्रीगोंदा तालुक्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार

0

चुकीचे रीडिंग, वाढीव बिलांचा ग्राहकांना करावा लागतो सामाना

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भोंगळ कारभारामुळे वसईतील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ग्राहकांना अवाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाठी वीज बिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली.

वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर या समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विजेचा मीटर बंद असल्याची लेखी तक्रार करूनही अनेक महिने त्याची दखल घेतली जात नाही.मीटर बदलून झाल्यावर त्याचा अहवाल पाठवला जात नाही, तर चुकीचे रीडिंग हा त्रास गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जास्त जाणवत असल्याचे श्रीगोंदेकरांचे मत आहे. संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नसून त्रस्त होऊन सुधारलेले बिल भरले तरी त्याची नोंद नसल्याने पुन्हा दुसर्‍या महिन्यात चुकीचे बिल येत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली.

नागरीकांची टाळाटाळ
वीज चोरीची माहिती देणार्‍या व्यक्तीस महावितरणकडून आतापर्यंत जास्तीत जास्त एक हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येत होते . परंतू यात महावितरणने भरीव वाढ केली असून वीज चोरीची माहिती देणार्‍या नागरीकास वीज चोरीच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम देण्यात येईल. अशी महावितरणची एक घोषणा होती. मात्र तालुक्यात वीज चोरी कळवा आणि फुकट भरपूर मार खा, हि योजना सुरु असल्यामुळे याबाबत माहिती देण्यास नागरीकातून मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जाते.

Copy