श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थींना दोन महिन्याचे वेतन द्यावे

0

भुसावळ : श्रावण बाळ योजनेतील लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन महिन्याचे थकीत मानधन त्वरत देण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी निवेदनाद्वारे तहसील प्रशासनाकडे केली आहे.

जनरल कोट्यातील लाभार्थी अनुदानापासून वंचित
सध्या भुसावळ विभागात श्रावण बाळ योजनेतील एकूण लाभार्थी दोन हजार 648 असून त्यातील एस.सी.कोट्यातील संख्या 482 असून एस.टी.लाभार्थी संख्या 78 इतकी आहे व जनरल श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी संख्या दोन 88 असून एस.सी.व एस.टी.लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे अनुदान मिळालेले आहे परंतु जनरल कोट्यातील दोन हजार 88 लाभार्थीना फेब्रुवारी व मार्च पर्यंतचे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ लाभार्थी रोज बँकेत जाऊन तास न तास उभे राहत आहेत मात्र बँकेत अनुदान न जमा झाल्या ने पुन्हा आपल्या नशिबाला दोष देऊन घरी येत आहे
श्रावण बाळ योजनेतील ऑफिसमध्ये विचारणा केली असता तेथील अधिकारी राज्य सरकारचा श्रावण बाळ योजनेतील दोन हजार 88 लाभार्थींसाठी 39 लाख 27 हजार 200 रुपयांचा निधी आला नसल्याचे सांगतात मात्र श्रावण बाळ योजना सर्वासाठी सारखीच असून एस.सी.एस टी.लाभार्थींचा निधी आला तर जनरलचा निधी आला नाही हे न पटण्यासारखे असल्याचे माजी नरगसेवक धांडे यांचे म्हणणे आहे. तहसीलदारांनी लक्ष घालून बँक खात्यात फेबु्रवारी व मार्च महिन्याचे अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.

Copy