श्रद्धा कॉलनीत २४ पासून हरिनाम सप्ताह

0

जळगाव प्रतिनिधी ।

श्रीमद् भागवत(संगीत) कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार दि. 24 ते 30 जानेवारीला श्रध्दा कॉलनी येथे करण्यात आले आहे. कथाकार ह.भ.प मनोज कुळकर्णी महाराज श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काळात दररोज सकाळी 5 ते 6 काकडा व 6 ते 7 विष्णू सहस्त्रमनाम, दुपारी 1 ते 5 श्रीमद् भगवत कथा निरूपण व संध्याकाळी 5 ते 6 यावेळेत हरिपाठ होणार आहे.

श्रीमद् भागवत सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम
श्रध्दा कॉलनीतील श्री पंचवटी महादेव मंदिर प्रांगण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन फालक परिवाराने केले आहे. दररोज सकाळी 5 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णु सहस्त्रनाम व दुपारी 1 ते 5 श्रीमद् भागवत कथा निरुपण होणार आहे. संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ होईल. यात पांडुरंग फालक, मनोहर फालक, रविंद्र फालक, लक्ष्मीबाई पांडूरंग फालक, विजया मनोहर फालक, कुंदा रविंद्र फालक, भूषण फालक, लिना भूषण फालक, हर्षल, अंकुर, करिश्मा आदींनी केले आहे. यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, मनोहर भंगाळे, किरण भारंबे, रविंद्र महाजन, विकी निभोरकर यांचे व श्रद्धा कॉलनी परिवार काम पाहत आहे. 30 जानेवारीला संध्याकाळी 5 ते 7 दिंडी सोहळा तर मंगळवार दि. 31 जानेवारीला सकाळी गीता पठन केले जाणार आहे. यानंतर सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.