शौचालय गैरव्यवहार प्रकरण : रावेरातील गटविकास अधिकार्‍यांची चौकशी

रावेर : रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी शुक्रवारी रावेर पोलिस ठाण्यात शौचालय घोटाळा प्रकरणी तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांच्याकडे उपस्थिती लावल्याने शहरात याबाबत चर्चा रंगली.

अधिकार्‍यांची तांत्रिक बाबींसाठी हजेरी
रावेर पंचायत समिती मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत असतांना या गुन्हा संदर्भात लवकरच दोषारोपपत्र न्यायालय दाखल होणार असतांना शुक्रवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी रावेर पोलिस स्टेशनला तपास अधिकारी यांच्याकडे उपस्थिती लावली. दरम्यान शौचालय घोटाळा प्रकरणाच्या तांत्रीक बाबींसंदर्भात गटविकास अधिकारी आले असल्याची माहिती तपासाधिकारी शीतलकुमार नाईक यांनी दिली.