शौचालयाचे सांडपाणी चक्क कुपनलिकेत

0

जळगाव । सर्वसामान्यांचे आधारवड असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात व्याधी दुर करण्यांसाठी शेकडो रुग्ण दररोज दाखल होतात. अत्याधुनिक सुविधा असतांनाही रुग्णांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यातच शौचालयाचे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या कुपनलिकेत जात असल्याच्या धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामूळे संपूर्ण रुग्णालयात आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना रूग्णसेवा मिळावी म्हणून 100 च्यावर खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय जळगावात निर्माण करण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांसह त्यांचे नातेवाईक शेकडो येत असतात. एका खाट वर दोन रुग्ण तर कधी कधी रुग्णांना जमीन झोपून उपचार घ्यावे लागतात. यामूळे किरकोळ वाद होवून गोंधळ देखील निर्माण होतो. बर्याच वेळा अपहरण, बाळ अदलाबदल यासह महिलांशी छेळ काढणे. असे प्रकार घडले असल्याने सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले असल्याचे चित्र आहे.
50 ते 60 पिण्याच्या टाकी : जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघात व आयुष विभाग आहे. या विभागाच्या लगत कुपनलिका आहे. कुपनलिकेजवळच शौचालयाचे सेफ्टि टँक आहे. ही टँक गेल्या काही दिवसांपासुन लिक झाली आहे. त्यामूळे शौचालयाचे सांडपाणी कुपनलिकेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी सांडपाणी तर आहेच मात्र मोठ्या प्रमाणात कचरा देखील पडलेला आहे. त्यामूळे परिसरात दुर्गंधीही वाढली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाची पिण्याच्या पाण्याची गरज पाहता 50 ते 60 टाक्यांची निर्मीती करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी दोन कुपनलिका, वसतिगृहासाठी एक, धोबी घाटसाठी एक व नवीन बांधकाम सुरु असल्याने त्यासाठी एक अश्या कुपनलीका करण्यात आल्या आहेत. मात्र यातील प्रत्यक्ष दोन कुपनलिका रुग्णाची तहान भागवत आहे. असे असतांना एक कुपनलिकेत सांडपाणी जात असल्याने रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्मचारी हात धुण्यासाठीही वापरत नाही पाणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचार्यांना कुपनलिकेबाबत माहित असल्याने ते पाणी वापरणे सोडले असल्याचे खाजगी कर्मचार सांगतात. त्यामूळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांसह कर्मचार्यांनी केली आहे.