शोपियात चकमक: दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

शोपिया: जम्मू-काश्मीरमधील शोपीया जिल्ह्यामधील किलोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात जवानाना यश आले आहे. जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. किलोरा गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी शोधमोहीम सुरू केली होती. परिसरास वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. प्रत्युतरात जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अद्यापही या ठिकाणी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Copy