Private Advt

शॉर्टसर्कीटमुळे साडे सहा लाखांचा ऊस आगीत खाक

जळगाव : शेतातील विद्युत तारांच्या शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत 2 हेक्टरमधील सुमारे साडे सहा लाखांचा उस जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात घडली. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली.

शॉर्टसर्किटने लागली आग
दीपक अशोक नारखेडे (33, रा.खालची अळी, नशिराबाद) यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर 152/1 मध्ये 2 हेक्टर 11 आर शेत आहे. या शेतात त्यांनी उसाची लागवड केली आहे. मंगळवार, 12 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तार्‍यांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला लागली. या आगीत ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. यामध्ये शेतकरी दीपक नारखेडे यांचे सहा लाख 30 हजार रूपयांचा ऊस आणि 20 हजार रुपये किंमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले. या संदर्भात दीपक नारखेडे यांनी नशिराबाद येथे दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहे.