शॉर्टसर्किटमुळे फ्लॅटला आग

0
पिंपळे सौदागमधील घटना
पिंपरी-चिंचवड : शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका फ्लॅटला आग लागली. या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन जवळ असलेल्या एका वसाहतीमध्ये घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर मधील गोविंद गार्डन जवळ असलेल्या एका वसाहतीत पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच वल्लभनगर आणि रहाटणी अग्निशमन विभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Copy