शेवटी इंदोरीकर महाराजांचे ‘ते प्रकरण’ कोर्टात

0

संगमनेर: “समतिथीला संबंध ठेवल्यावर मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी” या वाक्यामुळे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात अखेर कोर्टात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

संगमनेर येथील कोर्टासमोर आज हे प्रकरण सुनावणीसाठी येणार आहे. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आपल्या वक्तव्याचा संबंधी इंदुरीकर यांनी केलेला खुलासा कायद्याच्या जिल्हास्तरीय समितीने पूर्वीच फेटाळला होता. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा घेण्यात आला होता. त्यानुसार संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला होता. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इंदोरीकर महाराजांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयामार्फत नोटीस देण्यात आली होती. त्यावर खुलासा करताना इंदोरीकर महाराजांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते.

Copy