शेळीची 40 पिल्ले दगावली

0

इंदापुर : इंदापुर तालुक्यातील चिखली येथील शेळीची 40 पिल्ले अचानक दगावल्याने नागरिक धास्तावले आहेत. लहान पिल्लांनी अचानक दूध पिणे सोडून दिल्याने व मागील दोन आठवड्यात दगावलेल्या पिल्लांची संख्या जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक शेळीपालनाचा जोडधंदा करतात. मात्र, अचानक अशी आर्थिक झळ बसल्यानंतर कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे. गावातील 13 नागरिकांच्या शेळीची पिल्ले दोन आठवड्यात दगावली असल्याने उपचाराअभावी गावातील अजून पिल्ले मरण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पिल्लांनी अचानक दूध पिणे सोडून दिले तर एक पाय लंगडत दोन तासात हालचाल बंद केली. त्यानंतर काही क्षणात मृत्यू झाला. अन्य पिलांवर अद्यापही योग्य उपचार झालेले नाहीत यामुळे पिल्ले दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Copy