Private Advt

शेळगाव शिवारात कबुतर पकडताना तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू

जळगाव : कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणाचा घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शेळगाव शिवारात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. करण उर्फ कालू चुडामण भील (24, पवार, रा.शेळगाव, ता.जि.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने मृत्यू
जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शेळगाव शिवारातील गिरीष सदाशीव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी गेला. त्याच्यासोबत त्याचा भाचा तापीराम दामू भील आणि पुतण्या सम्राट गोरख भिल हे देखील होते. दरम्यान, विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. दरम्यान, त्याचा पाय निसटल्याने 200 फूट खोल विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. काका विहिरीत पडल्याचे पाहून पुतण्या सम्राट हा धावत गावात गेला व त्याने माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी धाव घेतली. पोलिस पाटील विलास पाटील आणि नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत प्रचंड गाळ असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. रविवार, 10 एप्रिल रोजी नागरीकांच्या मदतीने विहिरीतून दुपारी 12 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आाली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, हवालदार राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.