शेळगाव बॅरेजसाठी 700 कोटींचा निधी राखीव : जुलै महिन्यात पाणी अडवणार

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन : पाण्यासह मातीचे परीक्षण झाल्यास शेतीला फायदा

फैजपूर- शेतीला पूरक व्यवसाय करणे आता काळाची गरज आहे. शेतीमध्ये सकारात्मकता आणली पाहिजे त्यााठी नवनवीन पद्धतीचा अवलंब करायला हवा. माणसाची प्रकृती बिघडल्यास आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो तसे माती, पाणी परीक्षण झाल्यास त्याचा फायदा शेतीला होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला सातशे कोटीचा निधी बळीराजा योजने अंतर्गत राखून ठेवल्याचे सांगत आगामी जून-जुलै महिन्यात प्रकल्पामध्ये पाणी अडविले जाईल, असे खात्री दिली. फैजपूर येथील अटल महाकृषी कार्यशाळेत ते बोलत होते.

Copy