शेलवडच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

0

बोदवड : तालुक्यातील शेलवड येथील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. महेंद्र पंडित माळी (40) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास छातीत दुखत असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी बाळू पंडित माळी (36, शेलवड) यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक उद्दल चौहान करीत आहे. दरम्यान, मयताच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे.

Copy