शेतीसाठी सुध्दा मातीची वाहतूक केल्यास होणार कारवाई

रावेर : रावेर तालुक्यात सध्या शेतीच्या मशागतीचे काम प्रगतीपथावर सुरू असून काही शेतकरी शेतात माती टाकत असतील तर त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे कारण महसूलने प्रशासनाने माती वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा इशरा दिला आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील अधिसूचना क्र /गोखनि/10/1012/ प्र.क / 603 / ख, 11/02/2015 व त्यालगत मा.जिल्हाधिकारी जळगांव ( गौणखनिज शाखा) यांचेकडील पत्र क्र./गौखनि / ई कावि / 2015 / 8 / 26 / 601 दि . 16/10/2015 अन्वये स्वामीत्वधनाचे दर प्रती ब्रास प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार बहुतांश शेतकरी हे माती या गौणखनिजाचे शेतीच्या मशागतीसाठी वापर करणेकामी उत्खनन करून ट्रॅक्टर/ट्रक/इतर तत्सम वाहनाव्दारे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना याव्दारे आव्हान करण्यात येते की, शेतीकामी माती वाहतूककरतांना संबंधीत वाहनधारकाकडे रीतसर तहसील कार्यालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. तथापी वाहनधारकाकडे अशी परवानगी आढळून न आल्यास संबंधीतावर अवैध गौणखनिजाची वाहतुक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.