शेतीला जास्तीत जास्त पाणी मिळावे हेच ध्येय

0

धुळे : जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पाणी अडविणे आणि शेतकर्‍यांच्या शेतीला जास्तीजास्त पाणी देणे हेच आमचे ध्येय असून जलयुक्त शिवार योजनाही प्रभावीपणे राबविण्याकडे आमचे लक्ष असल्याचे प्रतिपादन आ.कुणाल पाटील यांनी भूमीपुजन समारंभात केले. धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे 22 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्यावतीने भटवाई नाल्यावर जलयुुक्त शिवार योजनतून साठवण बंधार्‍याच्या कामाचे भूमीपुजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी आ.कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायाम शाळेच्या इमारत बांधकामाचेही भूमीपुजन झाले.

या साठवण बंधार्‍यासाठी एकूण 11.02लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याप्रसगी आ.पाटील पुढे म्हणाले कि,धुळे तालुक्यात जुन 2016अखेर एकूण 43 गावांमध्ये 232 बंधार्‍यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले. आज त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतांना दिसत आहे त्याचे समाधान आम्हाला आहे. तालुक्यात जलयुक्त शिवार योजनाही प्रभावी आणि पारदर्शक व शेतकर्‍यांच्यादृष्टीने फायदेशी ठरेल अशी राबविण्याचे काम आम्ही करीत आहोत,या योजनेची व्याप्ती व बदल करणे गरजेचे जरी असले तरी आज या योजनेचा शेतकर्‍यांच्या शेतीला फायदा होणेसाठी विशेष लक्ष आम्ही देत असतो,मोरशेवडी गावाच्या शिवारात एकूण 80 लाखाचे जलयुक्त बंधार्‍याच्या कामातून या भागातील सिंचन क्षेत्रात नक्कीच वाढ होईल.तालुक्यात जास्तीत जास्त पाणी अडवून सर्व शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे हेच आमचे ध्येय आहे असेही आ.कुणाल पाटील यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमात समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून सभापती मधुकर गर्दे, पं.स.सदस्या सरस्वतीबाई वाघ,कृऊबाचे संचालक अशोक राजपुत, मोराणे सरपंच प्रविण ठाकरे, मोरशेवडी सरपंच पावबा वाघ,ए.बी.पाटील,सडगाव सरपंच दादाजी पदमर,जुन्नर सरपंच अशोक चव्हाण,तुळशिराम पवार, रतन पाटील, सखाराम गवळी, बजरंग लोधी,बल्हाणे माजी सरपंच आनंदा बागले, पाडळदे सरपंच किरण पवार,ह.भ.प.जिभाऊ महाराज, उपसरपंच तुकाराम मराठे, साहेबराव जाधव,शामराव चव्हाण मगन साळवे यांच्यासह परिसरात पदाधिकारी उपस्थित होते.